मुंबई | शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचा आज मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला आहे. शिंदे गटातील 9 आणि भाजपचे 9 एकूण 18 आमदारांनी मंत्री आज (9 ऑगस्ट) शपथ घेतली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज मुंबईतील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथविधीची सोहळा पार पडला. शिंदे सरकारमध्ये भाजपकडून सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज मंत्री मंत्री पदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांचा संक्षिप्त परिचय करू घेऊ या.
सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै, 1962 रोजी चंद्रपूर येथे झाला. मुनगंटीवार यांनी एम.कॉम., एलएल.बी., बी.जे., डी.बी.एम., एम.फिल शिक्षण घेतले आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्नीचे नाव सपना असे आहे. सुधीर मुनगंटीवार यांना एकच कन्यारत्न असून व्यवसायाने शेतकरी असून 72-बल्लारपूर, जिल्हा-चंद्रपूर या मंतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार आमदार आहेत.
सुधीर मुनगंटीवार यांची राजकीय परिचय
सुधीर मुनगंटीवार हे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयचे अध्यक्ष राहिले होते. अध्यक्ष, राष्ट्रचेतना लोक-कल्याणकारी संस्था; 1989 बेरोजगारांच्या हक्कासाठी मोर्चांचे आयोजन. 1994 बेरोजगारांसाठी युवाधिकार परिषदेचे आयोजन; 1993 स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चाचे आयोजन; नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव द्यावे यासाठी विशेष प्रयत्न. विधानसभेच्या माध्यमातून केलेल्या संसदीय संघर्षाला यश प्राप्त; शासनाकडे सभागृहाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे 1999 मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती. उपेक्षित मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग आयोग. 1 जानेवारी, 1998 रोजी राज्यात स्वतंत्र खनिज विकास मंत्रालय सुरु करण्यात यश. गडचिरोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मार्कण्डेश्वर मंदिर परिसराचा शासन निधी प्राप्त करुन विकास केला; चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ निर्मितीसाठीच्या लढ्याचे नेतृत्व. जुलै, 2010 च्या अधिवेशनात याबाबत कार्यवाही पूर्ण; शासकीय विविध योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी ‘आधार अपंगांचा’, ‘आधारगाथा’ व ‘प्रकाश वंचितांसाठी’ या पुस्तकांचे प्रकाशन व मोफत वाटप. आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबिरांचे आयोजन; 1999 मध्ये चंद्रपूर शहरात मोफत सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय उपक्रम सुरु केले.
1979 व 1981 सह सचिव व अध्यक्ष, छात्रसंघ सरदार पटेल महाविद्यालय; 1979 सचिव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, चंद्रपूर. 1980 सचिव, चंद्रपूर शहर भारतीय जनता पक्ष; 1987 अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा; 1993 उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा; 1996 सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष. 2002 उपाध्यक्ष, अखिल भारतीय युवा मोर्चा; एप्रिल, 2010-2013 प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्ष; 1995-1999, 1999-2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा. फेब्रुवारी, 1999 ते ऑक्टोबर, 1999 राज्याच्या पर्यटन व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री; चंद्रपूर जिल्ह्यातील झाडीपट्टी विभागाचे सांस्कृतिक वैभव संपूर्ण राज्याला माहिती व्हावे यासाठी मे, 1999 मध्ये चंद्रपूर झाडीपट्टी पर्यटन महोत्सवाचे आयोजन; संपूर्ण चंद्रपुर जिल्हा दारु बंदी करण्यात यश; राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे विधानसभेतील सन 1998 चा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्राप्त; 2009-2012 विधीमंडळ भारतीय जनता पक्षाचे प्रतोद; 31 ऑक्टोबर, 2014 ते नोव्हेंबर, 2019 वित्त व नियोजन आणि वने खात्याचे मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; सन 2020 पासून समिती प्रमुख, लोकलेखा समिती 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.