HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#KnowYourNeta | जाणून घ्या…वर्धा मतदारसंघाबाबत !

आगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी आपल्याला माहिती ही असायलाच हवी. म्हणूनच आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांच्या उमेदवारांची माहिती करून देणार आहोत. तेव्हा जाणून घ्या… कोण आहे तुमचा नेता ?

जाणून घेऊया… महाराष्ट्रातील वर्धा मतदारसंघाबाबत. वर्धा मतदार संघाअंतर्गत ६ विधानसभेच्या जागा येतात. ज्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवली, धामणगाव रेल्वे,आणि मोर्शी यापैकी ३ ठिकाणी कॉंग्रेस तर ३ ठिकाणी भाजपची सत्ता आहे. वर्धा येथून यावेळी भाजपकडून रामदास तडस तर कॉंग्रेसकडून चारुलता टोकस लोकसभेचे उमेदवार आहे. तर बहुजन समाज पार्टीचे शैलेषकुमार अग्रवाल, वंचित बहुजन आघाडीचे धनराज वंजारी, लोकजागर पार्टिचे ज्ञानेश्वर वाकुडकर आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून ९ असे एकूण १४ उमेदवार वर्धेमधून रिंगणात उतरलेत.

वर्ध्यातील २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल

२०१४ मध्ये वर्ध्यातून भाजपकडून रामदास तडस उभे राहिले होते. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसचे सागर मेघे तर बसापाचे चेतन पेंदाम हे उभे होते. त्यापैकी भाजपचे रामदास तडस यांचा ५३,७,५१८ मतांनी विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या सागर मेघे यांना ३२,१,७३५ मते मिळाली होती. जवळपास २,१५,७८३ इतक्या मतांच्या फरकाने रामदास तडस यांचा विजय झाला होता. तर बसपाच्या चेतन पेंदाम यांना ९०,८६६ मतं मिळाली होती. ३४.३६ टक्के मते भाजपच्या पारड्यात पडली होती तर कॉंग्रेसच्या मतांचा टक्का २०.५६ इतका होता. बसपाला केवळ ५.८१ टक्के मतं मिळाली होती.

वर्ध्याची मतदार संख्या

वर्ध्याची मतदार संख्या पहिली तर एकूण मतदार जवळपास १,५६,४,५५२ आहेत. त्यापैकी महिला मतदार ७,४७,०२४ तर ८,१७,५१४ एवढी पुरुष मतदारांची संख्या आहे

कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत राहिली

वर्ध्यात कायमच कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ लढत राहिली आहे. यावेळी देखील भाजपचे रामदास तडस यांच्या विरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस उभ्या आहेत. गेल्या ५ वर्षात रस्ते, आवास योजना, स्वच्छता अशा अनेक मुद्द्यांवर तडस यांनी चांगले काम केल्याचे बोलले जाते. मात्र शेतकऱ्यांचा रोशही या ठिकाणी दिसून येतो. तर दुसरीकडे चारुलता टोकस या वर्ध्यापेक्षा अधिक वेळ गुडगाव येथे असतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना मिळणारा प्रतिसादही त्याप्रमाणात कमीच दिसून येतो.

भाजपचे पारडे जड राहणार कि कॉंग्रेस आपला गड राखणार ?

यापूर्वी तब्बल १२ वेळा वर्ध्यातील सत्ता कॉंग्रेसच्या हाती आली होती. तर मागील वर्षी येथे भाजपला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. तर यावेळी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. २०१४ सालाप्रमाणे वर्ध्यात पुन्हा भाजपचे पारडे जण होणार कि इतिहासप्रमाणे कॉंग्रेस आपला गड राखणार हे निकाल आल्यावरच कळेल.

Related posts

मी निवडणूक लढायला तयार आहे !

News Desk

पंतप्रधान मोदी, आम्ही इथले भाडेकरू नाही | असदुद्दीन ओवैसी

News Desk

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ विधानामुळे पुन्हा उडाला नेटिझन्सचा गोंधळ

News Desk