HW News Marathi
राजकारण

जाणून घ्या…कोणकोणत्या सिनेकलाकारांनी केले पंतप्रधान मोदींचे अभिनंदन

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकाकीचा निकाल गुरुवारी (२३ मे) जाहीर झाला असून देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल दिला आहे. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून, विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करण्यात आले आहे. देशातील सिनेकलाकारांनी देखील पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

  • साउथचे सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. “तुम्ही करून दाखवले”, असे रजनीकांत यांनी म्हटले आहे.

  • बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याने देखील पंतप्रधान मोदींचे या ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

  • “देखा… योगा से ही होगा” असे म्हणत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

  • बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने देखील या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींच्या पुढच्या वाटचालीसाठी देखील अक्षय कुमारने शुभेच्छा दिल्या आहेत.

  • अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

  • बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने देखील या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अभिनंदन केले आहे.

  • प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ए.आर. रहमान यांनी देखील पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ची हाफ सेंच्युरी

News Desk

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

News Desk

काँग्रेसला आघाडीसाठी विचारुन थकलो पण काँग्रेस दादच देत नाही !

News Desk