श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त केली आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र पाठवून पुन्हा सत्ता स्थापनेसाठी दावा केला आहे. मुक्तींनी बुधवारी (२१ नोव्हेंबर)ला सायंकाळी राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. परंतु मुक्ती यांनी राज्यपालांना पत्र पाठविले असले तरी त्यांचा राज्यपालांशी संपर्क झालेला नव्हता. यानंतर अवघ्या तासभरानंतर राज्यपालांन विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या बळावर सरकार स्थापन करण्याच्या मेहबूबा मुफ्ती यांच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे.
मेहबुबा यांनी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) यांनी पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. ५६ आमदारांचा पाठिंबा असल्याचेही म्हटले आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून निर्णयाची माहिती दिली आहे. राजभवनात पाठिंब्याचे पत्र पाठविण्यास प्रयत्न करत आहे, पण फॅक्स झालेला नाही. राज्यपालांना फोनवरूनही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे तुम्ही येथून पाहाल अशी आशा आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
Have been trying to send this letter to Rajbhavan. Strangely the fax is not received. Tried to contact HE Governor on phone. Not available. Hope you see it @jandkgovernor pic.twitter.com/wpsMx6HTa8
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) November 21, 2018
मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर १६ जून रोजी सरकार पडले. जम्मू- काश्मीर विधानसभेच्या ८७ जागांपैकी पीडीपीकडे २८, भाजप २५, एनसी १५, काँग्रेस १२ आणि इतरांकडे ७ जागा आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.