HW News Marathi
राजकारण

नवरात्रोत्सवानिमित्ताने ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार

मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) या नवरात्रोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदा ही ठाण्यातील टेंभी नाक्यावर (Tembhi Naka) देवीच्या दर्शनासाठी जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यंदाची राजकीय परिस्थिती पाहिली तर रश्मी ठाकरे आज (29 सप्टेंबर) टेंभी नाक्यावरील देवीच्या आरतीला हजेरी लावल्यानंतर ठाण्यातील राजकीय वातारवण तापलेले पाहायला मिळेल. यामुळे ठाण्यात शिवसेना-शिंदे गट आमनेसामने येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिंदेंचे राजकीय गुरु आनंद दिघेंनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असून गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील, अशी शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “मुंबईतील महिलांना ठाण्यात आणण्यात येईल, असे त्या म्हटले.

राज्याचे एकनाथ शिंदेंनी बंडखोरी करत भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. या एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. शिंदे गटाच्या 40 आमदारांच्या आपात्रतेच्या मुद्यांवर 1 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयावर सुनावणी होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबादेवीमध्ये मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला केलेल्या मारहाणीनंतर पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया

Aprna

राफेलबाबत मोदी सरकार देशभरात घेणार ७० पत्रकार परिषदा

News Desk

रामाचा वनवास 2019 पूर्वी संपवा !

News Desk