HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : काँग्रेसचे महाराष्ट्रातील ५ उमेदवार जाहीर

मुंबई | आगामी लोकसभा निवडणूक आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशभरात ११ एप्रिलपासून ७ टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज (१३ मार्च) काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील ५ उमेदवारांची नावे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंदी या ५ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या या दुसऱ्या यादीत एकूण २१ उमेदवारांची नावे आहेत. त्यापैकी ५ उमेदवार हे महाराष्ट्रातील असून अन्य १६ उमेदवार उत्तर प्रदेशातील आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडून देखील लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांची नावे                                  मतदारसंघ

नाना पटोले                                                नागपूर
डॉ. नामदेव उसेंदी                                  गडचिरोली
सुशीलकुमार शिंदे                                    सोलापूर
प्रिया दत्त                                            उत्तर मध्य मुंबई
मिलिंद देवरा                                          दक्षिण मुंबई

 

Related posts

पंतप्रधान मोदी ‘जुमला राजा’ तर त्यांची राजवट ‘चौपट राज’

News Desk

…म्हणून मी पंतप्रधान मोदींविरुद्ध वाराणसीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला !

News Desk

राहुल गांधींनी देशाची माफी मागावी | दाणवे

News Desk