HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने दणक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. “मी देशाचा पंतप्रधान नव्हे तर चौकीदार आहे”, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वाक्य चांगलेच गाजले. त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वाक्यावरून त्यांची फिरकी घेत “चौकीदार चोर है” च्या घोषणा दिल्या. मात्र, आता पुन्हा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपकडून एक वेगळेच प्रचारतंत्र राबविण्यात येत आहेत. ट्विटरवर सध्या भाजपच्या सर्व नेत्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर त्यांच्या स्वतःच्या नावांआधी “चौकीदार” असा उल्लेख करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने “मैं भी चौकीदार” ही मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. “देशाचा चौकीदार खंभीरपणे उभा आहे, देशाची सेवा करतो आहे. परंतु, मी एकटा नाही. भ्रष्टाचाराविरोधात, समाजातील गुन्हेगारीविरोधात जो उभा आहे तो प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. भारताच्या प्रगतीसाठी, विकासासाठी प्रामाणिक आणि अथक प्रयत्न करणारा प्रत्येक भारतीय ‘चौकीदार’ आहे. आज प्रत्येक भारतीय बोलत आहे “मैं भी चौकीदार”, अशा आशयाचे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (१५ मार्च) आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला होता.

Related posts

चले जाओ मोदी

News Desk

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या चार जागा सोडण्याचा रिपाइंचा भाजपला प्रस्ताव

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबहिताकरिता सत्तेचा दुरुपयोग | सचिन सावंत

News Desk