HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : बी. जी. कोळसे पाटील वंचित बहुजन आघाडीतून बाहेर

मुंबई | बी. जी. कोळसे पाटील हे वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. कोळसे पाटील यांनी आपल्या स्वत:च्या फेसबुक पेजवरून याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी वंचित बहुजन आघाडीचा बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे”, असे कोळसे पाटील यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. “वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले होते की, औरंगाबादची जागा सगळ्यांनी सोडावी. त्यावेळी झालेला निर्णय हा विचारविनिमयाने झाला होता. पण काँग्रेसशी तडजोड होऊ शकली नाही. त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीकडून न लढण्याचा निर्णय घेतला” असेही कोळसे पाटील यांनी म्हटले आहे. “वंचित आघाडी स्वबळावर सगळ्या जागा लढवत आहे. याचाच अर्थ ती कॉंग्रेसला संपवण्यासाठी आरएसएसला मदत करत आहे”, असा आरोपही यावेळी कोळसे पाटील यांनी केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर महाविकास आघाडी बहुमतात आहे”, अजित पवारांचे स्पष्ट मत

Aprna

“महाराष्ट्रातील मिंधे सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले”, सामनातून टीका

Aprna

“गेट वेल सून माय फ्रेंड बीजेपी” | संजय राऊत

News Desk