HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : थोड्याच वेळात जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आज (२१ मार्च) थोड्याच वेळात भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपच्या या पहिल्या उमेदवार यादी उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडसह महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांची नावे जाहीर होणार असल्याची शक्यता आहेत. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात जे पी नड्डा आज संध्याकाळी ७ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ देखील जाहीर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत आगामी लोकसभेच्या जवळपास २०० जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत महाराष्ट्रातील जवळपास ९ ते १० उमेदवारांची नावे असण्याची शक्यता आहे. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका पार पडतील. ११ एप्रिल हा पहिला टप्पा आहे. दरम्यान, भाजपकडून पहिल्या आणि दुसऱ्या टप्यातील निवडणुकांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेच्या धमक्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला !

News Desk

सेना-भाजपने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले

News Desk

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

News Desk