HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : काँग्रेससोबत आमची कोणत्याही प्रकराची आघाडी नाही !

नवी दिल्ली | बसपा सर्वांना पुन्हा एकदा स्पष्ट करते की, उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षासोबत आमची कोणत्याही प्रकराची आघाडी नाही, असे सांगत बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी ट्विट करत काँग्रेसवर हल्ला चढविला. मयावती पुढे असे देखील म्हणाल्या की, काँग्रेसने बसपा-सपा त्यांच्यासोबत असल्याच्या अफवा पसरवून नये, अशा इशार देखील त्यांनी दिला आहे.

सपा-बसपा यांची आघाडी ही उत्तर प्रदेशातील ८० जागावर आपले उमेदवार उभे करून भाजपला निवडणुकीत कडवे आव्हान देणार असून उत्तर प्रदेशात सपा-बसपासाठी काँग्रेस जबरदस्ती ७ जागा सोडल्याच्या अफवा पसरवित आहे. काँग्रेसकडून पसविण्यात येणाऱ्या अफवांवर आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाही. असे ट्विट मायावती यांनी करत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी रविवारी (१७ मार्च) सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी २ जागा सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पत्रकारांना दिली. लोकसभा निवडणुकीसाठी सपा-बसपा यांच्या आघाडीने रायबरेली आणि अमेठी जागांवर उमेदवार उभे करणार नाही. त्यामुळे सपा-बसपा यांच्या निर्णयाचा सन्मान राखत आम्ही देखील त्यांच्या आघाडीसाठी ७ जागांवर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बब्बर यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातमध्ये मुस्लिमांची परिस्थिती इतर राज्यांपेक्षा खूप चांगली !

News Desk

नितेश राणेंनी महापालिकेवरील मोर्चा पुढे ढकलला

swarit

डॉ राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी

swarit