HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात !

नवी दिल्ली | “योगी आदित्यनाथ फक्त मोठमोठ्या बाता मारतात, परंतु राज्यात विकास झालेला दिसतच नाही. ५६ इंच छातीवाले रोजगार का उपलब्ध करून देऊ शकत नाही ? कारण त्यात तुम्ही असक्षम आहात. गेल्या ५ वर्षात केंद्राने काहीही केले नाही”, अशी टीका काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे चौकीदार हे गरिबांचे नव्हे तर श्रीमंतांचे असतात असा टोलाही यावेळी प्रियांका गांधी यांनी लगावला आहे. त्या सीतामढीमध्ये बोलत होत्या.

“गरीब शेतकऱ्यांचे चौकीदार नसतात. चौकीदार हे श्रीमंतांचे असतात”, असाही टोला यावेळी प्रियांका गांधी यांनी लगावला आहे. “तुम्ही जर इतके ताकदवान आहात, तुमची ५६ इंचाची छाती आहे. तर मग तुम्ही देशात रोजगारसंधी उपलब्ध करून का देऊ शकला नाहीत ? कारण त्यात तुम्ही असक्षम ठरलात. तुमचे सरकार कमकुवत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये केंद्राने काहीही केलेले नाही”, असे प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणाल्या आहेत.

आगामी लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना राजकीय पक्ष एकमेकांवर टोकाची टीका करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे वारंवारच भाजप आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असतात. दरम्यान, आता प्रियांका गांधी यांनी देखील थेटपणे पंतप्रधान मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

Related posts

आमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत !

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…हिंगोली मतदारसंघाबाबत

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात

News Desk