HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : अखेर हार्दिक पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी आज (१२ मार्च) अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर आता हार्दिक जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त येत आहे. दरम्यान, अद्याप काँग्रेसकडून याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हार्दिक पटेल कोणत्याही क्षणी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चा सुरु होत्या. राजकीय अभ्यासकांच्या मते, हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला गुजरातमधील त्या ठिकाणी जास्त फायदा होणार आहे जिथे पाटीदार समाजाचे वर्चस्व अधिक आहे. हार्दिक पटेल यांनी एप्रिल २०१५ मध्ये पाटीदार आरक्षण आंदोलन समितीअंतर्गत विसनगरमध्ये आपले पहिले आंदोलन केले होते.

Related posts

मी नीतिमत्ता गहाण ठेऊन राजकारण करणार नाही !

News Desk

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

News Desk

देवेंद्र फडणवीस म्हणजे बसवलेला मुख्यमंत्री !

News Desk