HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : पहिल्या टप्प्यात ‘या’ दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

नवी दिल्ली | ‘लोकसभा निवडणूक २०१९’ साठीच्या मतदानाला आजपासून (११ एप्रिल) सुरुवात झाली आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये ही मतदानप्रक्रिया पार पडेल. या ७ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. देशातील २० राज्यात ९१ मतदारसंघात आज (११ एप्रिल) मतदानाला सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू असणार आहे.  यावेळी देशभरातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूर मतदारसंघातून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी इतरांना देखील आपला हा मतदानाचा हक्क आवाहन केले आहे.

भाजप नेते आणि नागपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी नितीन गडकरी यांनी नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.

योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील हरिद्वार मतदारसंघातून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे.

वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगन मोहन रेड्डी यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदारांनी बदल घडवून आणण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन यावेळी जगन मोहन रेड्डी यांनी केले आहे.

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.

“बुरखा घालून मतदानासाठी आलेल्या महिलांची चौकशी न करताच त्यांना मतदानासाठी पुढे पाठवले जात आहे. येथे बनावट मतदान होत आहे”, असा आरोप उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरचे भाजपचे उमेदवार संजीव बालियान यांनी केला आहे.

Related posts

काँग्रेसच्या सचिव पदी अभिनेत्री नगमा यांची वर्णी

अपर्णा गोतपागर

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

News Desk

तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

News Desk