HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : मनसेने लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावे !

मुंबई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठींबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवून आणि डिपॉझीट वाचूवन दाखवावे, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात केलेल्या विधानावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, “आज रंगशारदामध्ये जेथे अनेक नाटक होतात. त्यात अजून एक नाटक पहायला मिळाले.”

मला आता मनसेला सांगायचे आहे की, “तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझीट वाचवून दाखवा. सध्या मला आश्चर्य वाटत की राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते असूनही आपल्या सैन्याच्या कामगिरीबद्दल अशा पध्दतीने बोलणे हा सैन्याचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने ते पाकिस्तानचे हिरो होऊ इच्छितात का ? अशा पध्दतीचा प्रश्न सामान्यांच्या मनात येईल, असेच ते बोलत होते.”

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…कल्याण मतदारसंघाबाबत

Atul Chavan

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘पाच’ महत्त्वाच्या योजना

News Desk

केंद्र सरकार देश तोडण्याचे राजकारण करते | राहुल गांधी

Kiran Yadav