नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता देशातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी (१६ मार्च) रात्री आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत १८ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर कॉंग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवाराच्या तिसऱ्या या यादीत आसाममधील ५, मेघालयमधील २, उत्तर प्रदेशमधील १, सिक्कीम आणि नागालँडमधील प्रत्येकी १ आणि तेलंगणामधील ८ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.
Congress releases third list of 18 candidates (5 Assam, 8 Telangana, 2 Meghalaya and 1 each for Nagaland, Sikkim & UP) for the upcoming LS polls. Sushmita Dev to contest from Silchar, G Gogoi to contest from Kaliabor, Mukul Sangma to contest from Tura & Tanuj Punia from Barabanki pic.twitter.com/W8Cb05SRFy
— ANI (@ANI) March 15, 2019
अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष सुष्मिता देव यांना सिमर लोकसभा मतदारसंघातून तर गौरव गोगोई यांना आसाममधील कालीबोर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.