HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : आता दररोज एक एक घराणे भाजपमध्ये येईल !

मुंबई | “आज उत्तर महाराष्ट्रातील एक घराणे भाजपमध्ये आलेले पाहायला मिळेल, उद्या सोलापुरातील घराणे भाजपमध्ये येईल. अशा पद्धतीने दररोज एक एक घराणे भाजपत येईल”, असा टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील बोलत होते. ते कोल्‍हापुरात झालेल्या भाजपच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.

‘‘आयुष्यात खूप कमी वेळा इतके अवघड प्रसंग येतात. या अवघड प्रसंगाला सामोरे जाणारे आम्‍ही सर्वच जण आज एकाच रांगेत बसलो आहोत. महाभारताच्या वेळी अर्जुनाला देखील असाच प्रसंग आला होता. धर्मासाठी लढ असे सांगून कृष्णाने अर्जुनाच्या मनातील द्वंद्व संपविले होते. आम्हाला आमच्या मनातही द्वंद्व संपवून युतीसाठी लढावे लागेल’’, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

Related posts

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिवपदी ट्रान्सजेंडर व्यक्तीची निवड

Arati More

मुख्यमंत्री शिवसेनेचाच, राष्ट्रीय राजकारणावरही भगव्याचाच वरचष्मा असेल !

News Desk

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भुजबळांना तुर्तास दिलासा 

News Desk