HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

#LokSabhaElections2019 : अखेर रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई | राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज (२० मार्च) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले रणजितसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीला राम राम ठोकून भाजपला साथ देणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत.
मोहिते-पाटील यांनी मंगळवारी (१९ मार्च) अकलूजमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यात आपण भाजप प्रवेशाबाबत ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या मेळाव्यात तब्बल ५,००० कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. या मेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटील यांना बिनधास्तपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.

 

Related posts

‘पूरा बहुमत आएगा…’ मोदींवरचे हे रॅप सॉंग नक्की पहा

News Desk

पंतप्रधान मोदींवरील जीवनपट म्हणजे निवडणुकांमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न !

News Desk

चंद्रशेखर आझाद यांची सुटका करा | अविनाश महातेकर

News Desk