HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : शरद पवार हे जाणते नेते, ते ज्योतिषी कधीपासून झाले ?

नवी दिल्ली | “शरद पवार हे राजकारणातील जाणते नेते आहेत. मात्र, ते ज्योतिषी कधीपासून झाले ?”, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. “लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळतील. परंतु नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होऊ शकणार नाहीत”, असे भाकीत शरद पवार यांनी वर्तविले होते. त्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खोचक सवाल केला आहे.

“मला जेवढे राजकारणामधले कळते त्यावरून मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कमी आहे. मी काही ज्योतिषी नाही परंतु भाजपला बहुमत मिळणार नाही. भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरू शकतो, सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना मित्रपक्षाची मद घ्यावी लागेल आणि त्यासाठी पंतप्रधानपद दुसर्‍या व्यक्तीला द्यावे लागणार”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदयनराजे यांची भाजपमध्ये वापसी ? मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

Gauri Tilekar

शिवसेना-भाजप युती हिंदुत्त्वासाठी देशप्रेमासाठी !

News Desk

संजय राऊत प्रकरणात ED ने दोन ठिकाणी टाकले छापे

Aprna