नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने देखील ४२ जागांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे त्यात तब्बल ४१ टक्के महिला उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Trinamool Congress (TMC) releases list of 42 candidates contesting #LokSabhaElections2019 pic.twitter.com/ut1sCReYQB
— ANI (@ANI) March 12, 2019
आगामी लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी महिलांना दिलेल्या प्राधान्याचे विशेष कौतुक होत आहे. ममता यांच्या या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेस ४०.५ टक्के महिला उमेदवार देणार असल्याचे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. ममता यांच्या या निर्णयामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत लोकसभेतही महिला खासदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
West Bengal CM and TMC leader Mamata Banerjee: Trinamool Congress will field 40.5% female candidate in the upcoming Lok Sabha elections. This is a proud moment for us. pic.twitter.com/B1B2dBQOzY
— ANI (@ANI) March 12, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.