HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

नवी दिल्ली | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (२७ मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी उर्मिला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून उर्मिलाला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

माजी मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सोडलेल्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचा अन्य कोणताही नेता निवडणूक लढविण्यास तयार नाही. गेल्या निवडणुकांमध्ये संजय निरुपम या मतदारसंघातून ४ लाख मतांनी हारले होते. याच कारणामुळे यंदाच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. या मतदारसंघासाठी या आधी मराठी अभिनेत्री आसावरी जोशी आणि शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होत होती. या मतदारसंघात भाजपकडून गोपाल शेट्टी यांच्यासारख्या ताकदवान उमेदवार देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासंदर्भात कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक

News Desk

आचरेकरांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार का केले नाहीत !

News Desk

हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही ?

News Desk