HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : कुस्तीपटू योगेश्वर दत्त आता भाजपकडून निवडणुकीच्या उतरणार ? 

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर यांनी शुक्रवारी (२२ मार्च) केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता कुस्तीपटू योगेश्वर दत्त हे देखील भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुका लढविणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, योगेश्वर हे हरियाणातून लढवण्यास इच्छुक असल्याचे देखील म्हटले जात आहे.

योगेश्वर दत्त यांच्या नावाबाबत चर्चा झाल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव भाजपच्या हरियाणा निवडणूक समितीने केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवला आहे. आता अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेईल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेश्वर दत्त हे सोनीपतमधून आगामी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मात्र, योगेश्वर यांनी रोहतकमधून लढावे अशी भाजपची इच्छा असल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही !

swarit

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील यांनी दाखल केले ४ उमेदवारी अर्ज

News Desk

शपथविधी सोहळ्यापूर्वी मोदींनी महात्मा गांधी, वाजपेयींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

News Desk