मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजप-सेना युतीकडे पाच जागांची मागणी असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाने प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी आज (२५ फेब्रुवारी) पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आहे. परंतु युतीचे गणित निश्चित झाल्यानंतर आता भाजपकडून रासपला जागा मिळाणार का सर्वात मोठा प्रश्न आहे.
भाजप शिवसेनेची युती निश्चित झाली असून भाजपा २५ जागांवर तर शिवसेना २३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचा फॉर्म्युला फिक्स झाला आहे. परंतु या युतीत मित्र पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. या मित्र पक्षांपैकीच रासप हा एक पक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा द्याव्यात या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात आल्या आहेत. युतीनंतर आता महायुतीचे काय होणार हे येणारा काळच सांगेल.
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते हेही उपस्थित असणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.