HW News Marathi
राजकारण

समाजवादी पार्टीने शिवसेनेचे टेन्शन वाढवले, मुख्यमंत्र्यांना ‘सपा’ने विचारले ‘हे’ तीन महत्वाचे प्रश्न

मुंबई | गेल्या अडीच वर्षात तुम्ही मुस्लिमांसाठी काय केले?, असा सवाल समाजवादी पार्टीने पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या सूचनेनंतर समाजवादी पार्टीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यामुळे आता राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टीने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. सामाजवादी पार्टीचे दोन आमदार विधानसभेवर आहे.

समाजवादी पार्टीने काल पक्षाकडून जे मागणी करण्यात आला. यात सपाने पक्षा अंतर्गत मागण्या आणि पक्षासाठी मागण्या होत्या. परंतु,  समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांच्या आदेशानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. आणि या पत्राचे उत्तर जोपर्यंत येत नाही. तोपर्यंत सपा निर्णय कळवणार नाही. महाविकास आघाडीने सर्व आमदारांची आज (7 जून) सायंकाळी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहील.  समाजवादी पार्टीने लिहिलेल्या पत्रकार मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न केले आहेत. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित उतर मिळाल्यानंतर साप निर्णय घेईल, अशा चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
या प्रश्ना समाजवादी पार्टीने तीन महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. 
  • कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण हे महाविकासआघाडी हे सरकार बनविले.   पण त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचे काय झाले. त्यावर व्यवस्थित काम झाले का?, याचे मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे. आणि यापुढे या प्रोग्रामवर काम होणार आहे की नाही संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्टकरावी.
  •  सर्व जातींना धर्माना घेऊन हे सरकार चालेल आणि राज्याचा विकास होईल, असे आपण सरकार बनवण्याच्या आधी ठरविले होते. महाविकासआघाडी सरकारकडून मुस्लिमांसाठी काही करण्यात आले आहे का? किंवा काय केले जाणार आह? यासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी
  •  गेल्या 1 वर्षापासून राजकीय दबावाखाली हिंदुत्व, हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी असल्याचा दावा करत आहात. महाविकासआघाडीच्या हिंदुत्वाचा अर्थ काय?
आपण सर्वांसाठी म्हणजे सेक्युलर सरकार बनविले होते. महाविकासआघाडीकडून तीन प्रश्नांची उत्तरे आणि भूमिका स्पष्ट झाल्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असे समाजवादी पार्टीने पत्रात म्हटले आहे.

Related posts

जर ५६ इंचाची छाती आहे तर कुलभूषण जाधवला सोडून का आणत नाही ?

News Desk

कमांडर अभिनंदन यांची सुटका मोदींमुळे नव्हेच, मात्र त्यांनी संपूर्ण श्रेय घेतले !

News Desk

आपला पराभव होणार याचा अंदाज असल्यानेच पवारांनी बारामतीबाबत ‘ते’ विधान केले !

News Desk