HW News Marathi
राजकारण

सीमावादावर ‘मविआ’च्या खासदारांची शाहांसोबत चर्चा; बोम्मईंने ट्वीट करत पुन्हा महाराष्ट्राला डिवचले

मुंबई | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुन्हा एकदा बरळले आहे. महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी (9 डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.  “महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही”, ट्वीट करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला डिवचले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना भेटणार आहेत.

बसवराज बोम्मई ट्वीटमध्ये म्हणाले, “महाराष्ट्राच्या शिष्ठमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. यापूर्वी ही महाराष्ट्राने असे प्रयत्न केले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. आणि राज्यातील कायदेशी भूमिका मांडण्यासाठी मील लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे”, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी अमित शाह यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान महाविकास आघाडीच्या खासदारांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवरून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी सतत चितावणी खोर वक्तव्य करत आहे. यात अमित शाहांनी मध्यधी करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार प्रकल्पासाठी काहीच आठवड्यात जमीन मिळणार, यूएईच्या राजदूतांची माहिती

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

News Desk

आता यु टर्न म्हणजे उद्धवजी टर्न !

News Desk