HW News Marathi
राजकारण

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE | सेलिब्रिटींनीदेखील बजावला मतदानाचा हक्क

मुंबई | राज्यात आज (२१ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. राज्याच्या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडेल.या निवडणुकीकरिता काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत केलेले पक्षांतर, या पार्श्वभूमीवर ढवळून निघालेले राज्यातील राजकारण, दिग्गज राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे टोकाचे आरोप-प्रत्यारोप, टोकाची टीका, भाजप-शिवसेनेची वाढलेली ताकद, भाजपच्या दिग्गज नेत्यांचे राज्यावर असलेले लक्ष, आणि अन्य पक्षांची सुरु असलेली आपल्या अस्तित्त्वाची लढाई असे बरंच काही या निवडणुकांच्या अनुषंगाने पाहायला मिळाले. दरम्यान, आज मतदार राजा आज आपला मतदानाचा हक्क बजावेल. याच पार्श्वभूमीवर राजकीय दिगज्जांसह भारतीय चित्रपटसृष्टीतील कोणकोणत्या सेलिब्रिटीजनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, जाणून घ्या…

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE :

  • ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क

  • मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

  • अभिनेता मिलिंद गुणाजी आणि अभिनेत्री राणी गुणाजी यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी बजावला आपला मतदानाचा हक्क

  • रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • बॉलीवूड अभिनेता आमिर खान यांनी केले मतदान

  • बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता यांनी बजावला मतदानाचा हक्क

  • ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी केले मतदान

  • ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा हक्क

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रातील मिंधे सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले”, सामनातून टीका

Aprna

इंडस्ट्रीयल एडीशनल सचिव सतीश गवई यांना दिली ७ कोटींची लाच, मलिक यांचा आरोप

News Desk

“रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, MSRDC, MMRDA, महापालिकांनी त्वरित कार्यवाही करावी, ” मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna