HW News Marathi
राजकारण

#MaharashtraElections2019 | जालन्यात मतदानावेळी सरपंच, उपसरपंचात मोठी हाणामारी

जालना | राज्यात आज (२१ ऑक्टोबर) अखेर बहुप्रतीक्षित अशा १४ व्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जालना येथे मतदानावेळी सरपंच आणि उपसरपंचात चांगलाच राडा झाला. बदनापूर मतदारसंघातल्या जांभखेडमध्ये सरपंच इब्राहीम कुरेशी हे भाजपचे आहेत. तर उपसरपंच फजल कुरेशी हे राष्ट्रवादीचे आहेत. मतदार गाडीत बसवून आणल्याने दोन्ही सरपंचाच्या गटात आधी वाद झाला. त्यानंतर त्याचे बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामुळे वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाल. दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे सध्या वाद निवळला असून मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिराचाही अध्यादेश काढा ! – उद्धव ठाकरे

News Desk

#LokSabhaElections2019 : पाटीदार सामाजाचे नेते हार्दिक पटेल आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

News Desk

MCA निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलारांची युती; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna