नवी दिल्ली | कोलकात्यातील निवृत्त आयपीएस अधिकारी गौरव दत्त यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गौरव दत्त यांनी सुसाईड नोटमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून त्यात ममता बॅनर्जी यांनी आपल्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे म्हणण्यात आले आहे. या प्रकरणी भाजपने ममता बॅनर्जी यांच्या अटकेची मागणी केली आहे.
A 1986 batch IPS officer of West Bengal cadre GC Dutt committed suicide on February 19. He has accused West Bengal CM Mamta Banerjee for abetment. pic.twitter.com/4CV9uT3fwB
— Sumit Kumar Singh (@invincibleidea) February 21, 2019
‘ममता बॅनर्जी यांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. ममता बॅनर्जी यांनी गौरव दत्त यांना ‘कंपलसरी वेटिंग’वर ठेवले. तसेच ३१ डिसेंबर २०१८ रोजी निवृत्तीनंतर मिळणारे पैसे देखील दिले नाहीत’, असे असे गौरव दत्त यांच्या सुसाईड नोटमध्ये म्हणण्यात आले आहे.गौरव दत्त यांनी १९ फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. त्यामुळे आता या प्रकरणी भाजप नेते मुकुल रॉय आणि गौरव दत्त यांच्या पत्नी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.