HW News Marathi
राजकारण

ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी उत्तम उमेदवार !

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पंतप्रधान बनण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ममता बॅनर्जी यांचे नाव सर्वात पुढे असेल, असा विश्वास पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी व्यक्त केला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधानपदाच्या उमेदवारांमध्ये सर्वात पहिले नाव हे ममता बॅनर्जी यांचे असेल. देशाच्या पंतप्रधानपदी जर कोणता बंगाली व्यक्ती विराजमान होण्याची शक्यता असेल तर त्या ममता बॅनर्जी असल्याचे दिलीप घोष यांनी म्हटले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने दिलीप घोष यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्वाचे ठरत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी देखील ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे म्हटले होते. यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेस सोशल मीडिया सेलद्वारे आयोजित करण्यात आलेल्या ‘बांगला मंथन वार्ता’ स्तरांच्या दरम्यान हे विधान केले होते. यशवंत सिन्हा यांनी असे म्हटले कि, ममता बॅनर्जी यांच्या अंगी पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकारण व्यासपीठ आणि छत्रपती

News Desk

कोश्यारींना महाराष्ट्राचा कारभार नकोसा?; पदमुक्त होण्याच्या चर्चांवर राजभवनाकडून स्पष्टीकरण

Aprna

यापुढे युती नाही | उद्धव ठाकरे

News Desk