May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

“पंतप्रधान मोदी नीच” या आपल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर ठाम

नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी २०१७ साली गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वी “पंतप्रधान मोदी नीच आहेत” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काँग्रेसने अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली होती. मात्र, आपल्या त्या वक्तव्यावर आपण आजही ठाम असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे. ‘रायझिंग काश्मिर’ या वृत्तपत्रात अय्यर यांनी याबाबतचा लेख लिहिला आहे. दरम्यान, मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या रडारसंदर्भातील वक्तव्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगाळ वातावरणाचा फायदा घेण्याचा भारतीय वायुसेनेला सल्ला दिल्याचे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य अत्यंत मूर्खपणाचे आहे”, असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. मोदी अशाप्रकारचे अवैज्ञानिक दावे करत वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का ? पंतप्रधानांची चूकही सुधारता न येण्याएवढे हे अधिकारी घाबरट आहेत का ?”, असा प्रश्न अय्यर यांनी उपस्थित केला आहे.

नेमके काय म्हणाले होते मणिशंकर अय्यर ?

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करणाऱ्यांमध्ये एका व्यक्तीचे मोठे योगदान होते. ती व्यक्ती म्हणजेच जवाहरलाल नेहरु. अशा कुटुंबाबद्दल अत्यंत घाणेरडी वक्तव्ये केली जातात, तेसुद्धा डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला असे वाटते कि ही व्यक्ती (नरेंद्र मोदी) अत्यंत नीच प्रकारची आहे. या व्यक्तीत कोणतीही सभ्यता नाही. इतक्या चांगल्या प्रसंगी असे घाणेरडे राजकारण करण्याची गरज काय ?”, असे वक्तव्य मणिशंकर अय्यर यांनी केले होते.

Related posts

पंतप्रधान मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे !

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील 

Ramdas Pandewad

मनोहर पर्रीकर यांच्यावर आज संध्याकाळी पणजीमध्ये होणार अंत्यसंस्कार

News Desk