HW Marathi
राजकारण

मनोहर पर्रीकर प्रज्ञावंत,सुसंस्कृत, द्रष्टे राजकारणी: राज्यपाल विद्यासागर राव

महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

श्री मनोहर पर्रीकर हे समकालीन राजकारणातील अतिशय प्रज्ञावंत, सुसंस्कृत आणि द्रष्टे राजकरणी होते. गोव्याचे विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी प्रामाणिकपणा व सचोटीने कर्तव्य बजावले. त्यांना विकासाची दृष्टी होती आणि सामान्य जनतेच्या हिताची तीव्र कळकळ होती. मितभाषी असलेल्या पर्रीकर यांचे सर्व पक्षातील लोकांशी सलोख्याचे संबंध होते. अखेरपर्यंत कार्यशील राहणार्‍या पर्रीकर यांचे जीवन हा लोकसेवेला समर्पित कर्मयज्ञ होता. त्यांच्या निधनामुळे राजकारणातील एक दैदीप्यमान तारा निखळला आहे,या शब्दात राज्यपाल विद्यासागर राव यांनी पर्रीकर यांच्याप्रती आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

Related posts

राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत | अटलबिहारी वाजपेयी

News Desk

काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या प्रमुख दिव्या स्पंदनाचे ट्विटर अकाऊंट डिलीट

News Desk

…तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, अजित पवारांचे आव्हान

News Desk