HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

ईशान्य मुंबईसाठी सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा

मुंबई | भाजप खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने चांगलीच महागात पडणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी किरीट सोमय्या यांच्यऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी किरीट सोमय्यांकडून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु, उद्धव ठाकरेंकडून सोमय्या यांना भेटीसाठी वेळ देण्यास टाळाटाळ केली गेली.

मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपच्या कारकर्त्यांची भेट देखील घेतली आहे. तसेच पक्षाने कोटक यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्यास सांगितल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. ईशान्य मुंबईतून युतीचे उमेदवार किरीट सोमय्या की मनोज कोटक याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्रीय संसदीय समितीकडून घेतला जाईल.

विशेषतः शिवसैनिकांच्या रोषामुळे किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी देखील यापूर्वी किरीट सोमय्या यांना थेट आव्हान दिले होते. “गरज पडलीच तर मी अपक्ष लढेन. पण मी १०० टक्के सोमय्यांविरोधात निवडणूक लढविणार,” असे सुनील राऊत यांनी स्पष्ट केले होते. आता तर सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा देखील सुरु झाली आहे.

Related posts

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केलेली समिती सरकारच्या हातचे बाहुले | राजू शेट्टी

News Desk

एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर

Gauri Tilekar

ठाण्याच्या कचर्‍यावर पोसली जातेय शिवसेना !

News Desk