HW News Marathi
राजकारण

आचरेकरांवर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार का केले नाहीत !

मुंबई | माणूसकीचे विचार हरवलेले हे सरकार असून या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार अशी टिका आमदार हेमंत टकले यांनी भाजप सरकारवर केली. पद्मश्री रमाकांत आचरेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शासकीय इंतमामामध्ये अंत्यसंस्कार करणे गरजेचे होते परंतु भाजप सरकार आणि त्यांच्या क्रिडाखात्याला आचरेकरसरांचा विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारच्या या उदासिन कारभारावर आमदार हेमंत टकले यांनी जोरदार टिका केली आहे.

ज्या क्रिकेटपटूला भारतरत्न दिला त्याच्या गुरुचे निधन झाले आहे. त्यात आचरेकरसरांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान प्राप्त झालेल्या व्यक्तींना अंत्यसमयी शासकीय इंतमामामध्ये अंत्यसंस्कार व्हावेत असा नियम आहे. मध्यंतरी मनमाडचे माजी आमदार माधवराव गायकवाड यांचे निधन झाले. त्यावेळीही असाच प्रकार घडला होता. हा विषय आम्ही विधानपरिषदेमध्ये लावून धरला होता. त्यावेळी सरकारकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती असेही आमदार हेमंत टकले यांनी सांगितले.

सरकार म्हणतेय आम्ही पेपरलेसकडे चाललो आहोत तर मग रमाकांत आचरेकरसर कोण होते. त्यांना पद्मश्री मिळाली होती. परंतु हे सरकार आम्हाला कोणी कळवले नाही असे सांगायला मोकळे आहे. अरे तुम्हाला कोणी कळवायचे. तुमचे क्रीडाखातं काय करतेय…क्रीडा सचिव काय करत आहेत…त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता अशी विचारणाही आमदार हेमंत टकले यांनी केली.

देशातील सर्वात मोठया क्रिकेटपटूचे गुरु होते ते…त्यांनी केवळ सचिन तेंडुलकर नाही तर कित्येक क्रिकेटपटू घडवले आहेत. एवढा मोठा सन्मान क्रिकेटपटू त्यांना देतात…त्यांच्याविषयी सामान्य माणसांच्या मनात आदराचे स्थान होते. अशा व्यक्तीच्याबाबतीत अशी हेळसांड करणे म्हणजे हा निष्क्रीयतेचा आणि उदासिनतेचा प्रकार आहे अशी संतप्त प्रतिक्रियाही आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

आचरेकरसरांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी, क्रीडामंत्र्यांनी याची दखल घ्यायला हवी होती. परंतु हे ढिम्म बसले आहेत अशी संतप्त भावनाही आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली. ही माणसे स्वाभिमानी असतात. आचरेकरसरांना एकच मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे धावपळ करणारे असे कोण नव्हते. हा साधा माणूसकीचा प्रकार होता असेही आमदार हेमंत टकले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनेचं जमलंच ! हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा युती

News Desk

शेगावत होणाऱ्या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे हजेरी लावणार?

Aprna

मंत्रालयाच्या सचिव दालनात बेस्टच्या संपावर बैठकीला सुरुवात

News Desk