HW News Marathi
राजकारण

उद्याच सादर होणार मराठा आरक्षणाचा एटीआर

मुंबई | मराठा समाजच्या आरक्षणाचा एटीआर आज (२८ नोव्हेंबर) सभागृहात मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, हा अहवाल आज मांडण्यात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा अहवाल उद्याच (२९ सप्टेंबर) मांडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि कायदेतज्ज्ञ वकिलांसह आज बैठक झाली. या बैठकीनंतर मराठा आरक्षणाचा एटीआर आज मांडण्यात येणार नसल्याची माहिती देण्यात आली.

मराठा समाजच्या आरक्षणाच्या या कृती अहवालात कोणत्याही प्रकारच्या कायेदशीर अथवा तांत्रिक त्रुटी शिल्लक राहू नयेत आणि हे प्रकरण न्यायालयात देखील टिकून आरक्षणाला न्यायालयाकडून मंजुरी मिळावी, यासाठी आता या अहवालाचा अभ्यास केला जात आहे. हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच तो सभागृहात मांडण्यात येईल, अशी माहिती आहे. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर हा गुरुवारी (२९ नोव्हेंबर) हा अहवाल सभागृहात मांडला जाईल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे बबनराव थोरातांच्या ‘त्या’ चिथावणीखोर वक्तव्यामुळे उदय सामंत यांच्या गाडीवर झाला हल्ला

Aprna

राहुल गांधी जो निर्णय घेतील त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करू !

News Desk

फडणवीसांच्या मराठा आरक्षण बैठकीकडे या नेत्यांनी फिरवली पाठ !

News Desk