HW News Marathi
राजकारण

मराठा समाजाचे आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण

मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे आजपासून (शुक्रवार) आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या वेळी मराठा समाजाकडून काळ्या फिती, झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला जाणार आहे. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांमुळे यंदा मराठा समाजाकडून काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाजाचे समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली आहे.

“मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनामध्ये तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची प्रमुख मागणी यावेळी केली जाणार आहे” अशी माहिती मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ‘मराठा क्रांती मोर्चा’ या नावाने कुणालाही पक्ष स्थापन करू देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र तरीही मराठा समाजाच्या नव्या राजकीय पक्षाची स्थापना दिवाळी पाडव्याच्या दिवशी रायरेश्वर येथे करणार असल्याचे समितीने सांगितले आहे. ‘मराठा आरक्षण संघर्ष समिती’ची पहिली बैठक नरिमन पॉइंट येथे झाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील गावागावात १६ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर मराठा क्रांती मोर्चामार्फत ‘मराठा संवाद यात्रा’ निघणार आहे. तर मुंबईत ही ‘मराठा संवाद यात्रा’ २६ नोव्हेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनावर धडकणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार पाटील भाजपावर नाराज ?

News Desk

काश्मीरमध्ये कधी येऊ सांगा, राहुल गांधींचा सत्यपाल मलिक यांना सवाल

News Desk

…तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे | धनंजय मुंडे

News Desk