HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation | इम्तियाज जलिल यांची आरक्षणविरोधी याचिका मागे

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयात मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणीला सुरवात झाली आहे. अ‍ॅड. जयश्री पाटील यांच्यासह एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी देखील मराठा आरक्षणाला आव्हान दिले होते. मराठा समाजाला दिलेले आरक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाज जलील यांनी ही दाखल याचिका मागे घेतली आहे. दरम्यान, याचिकाकर्ते आणि विरोधकांना राज्य मागसवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल दिला जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वीच्या सुनावणीत राज्य सरकारला मराठा आरक्षण संदर्भातील मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान राज्य सरकारने मंगळवारी (२९ जानेवारी) मराठा आरक्षण अहवाल याचिकदारांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मराठा आरक्षणाचा अहवाल सीडी स्वरूपात देण्यास राज्य सरकार तयार आहे मात्र संशोधन देणार नसल्याची माहिती उच्च न्यायालयात देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी येत्या ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत सुनावणी होणार आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभीष्टचिंतन

Aprna

“पुढचे अडीच वर्ष ‘मविआ’ सरकार पूर्ण करेल”, संजय राऊतांचा विश्वास

Aprna

अहमदनगरच्या जागेसाठी सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?

News Desk