मुंबई | मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील विधेयक आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संध्याकाळी प्रसारमाध्यमांसमोर आपली पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींची पूर्तता केल्याने मराठा आरक्षण न्यायालयात टिकणारच, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे मी आभार मानतो. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही स्वतंत्र प्रवर्ग तयार केला आहे. त्याचप्रमाणे यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला आणि राज्यातील एकूण ५२ टक्के आरक्षणाला धक्का बसणार नाही. त्यामुळे लोकांमध्ये विनाकारण कोणत्याही शंका उपस्थित करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.