HW News Marathi
राजकारण

मार्गारेट अल्वा UPA कडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवारांनी केली घोषणा

मुंबई | यूपीएकडून मार्गारेट अल्वा हे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (17 जुलै) दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी सर्व विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अल्वा उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. भाजपकडून उपराष्ट्रपती पदासाठी जगदीप धनखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी 19 जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर उपराष्ट्रपती पदासाठी 6 ऑगस्टला मतदान होणार आहे. मार्गारेट अल्वा यांना यूपीए गटातील 17 पक्षांचा पाठिंबा असल्याचे शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच शरद पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते जयराम रमेश, डी. राजा, टी. आर. बालू, रामगोपाल यादव, सीताराम येच्युरी आदी नेते उपस्थिती होते.

मार्गारेट अल्वा यांचा अल्प परिचय

कर्नाटकातील मंगलोर येथील मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी झाला. अल्वा यांचे पूर्ण शिक्षण कर्नाटकात झाले आहे. यानंतर अल्वा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने अल्वा यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठविले. अल्वा या काँग्रेसकडून 4 वेळा राज्यसभेवर गेल्या आहेत. अल्वा यांच्यावर विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्ये सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसने अल्वा यांना 1975 मध्ये पक्षाचे सरचिटणीस केले होते. तर 1999 मध्ये अल्वा यांना लोकसभेतील सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिता पेटत होती अन् सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती !

News Desk

गरज पडली तर संघ राम मंदिरासाठी आंदोलन करेल | भय्याजी जोशी

Gauri Tilekar

रामदास कदम उद्धव ठाकरेंचा कुत्रा, नितेश राणेंची जहरी टीका

News Desk