HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात

आग्रा | अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा येथून पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  मथुरा येथे आज (१४ एप्रिल) हेमा मालिनी यांच्या प्रचार करण्यासाठी अभिनेता आणि पती धर्मेंद्र यांनी सभा संबोधित केली. धर्मेंद्र म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेमा मालिनी या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हेमा मालिनीचा विजय म्हणजे मथुरावासियांचा विजय असल्याचे त्यांनी त्यांचा भाषणादरम्यान म्हटले होते.

तसेच शेतात घाम गाळणारा शेतकरी गरज भासल्यास देशाच्या रक्षणासाठीही सज्ज असतो. जाट समुदायाला मतदान करण्याचे आवाहन  धर्मेंद्र यांच्याकडून करण्यात आले. धर्मेंद्रला पाहण्यासाठी त्यांच्या चहात्यांनी कडक उन्हात  मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोबाईलमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे छायाचित्र काढण्यासाठी लोकांची गर्दी लोटली होती.

हेमा मालिनी या त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त आहेत. एकदा प्रचारादरम्यान हेमा मालिनी शेतात गव्हाचे पीक कापताना,  शेतमजूर महिलांसोबत दिसल्या. तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालवताना दिसून आल्या. हेमा मालिनी यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

हेमा मालिनी यांनी २००४ मध्ये हेमा मालिनीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हेमा मालिनी यांना २००३ ते २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्य राहिल्या होत्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या.

Related posts

आयएनएस सुमित्रावर अक्षय कुमारला घेऊन जाणे बरोबर आहे का ?

News Desk

इम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड

News Desk

गेल्या चार साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत !

Gauri Tilekar