HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

सत्तास्थापनेसंदर्भात भाजपच्या निर्णयानंतर संध्याकाळी ‘मातोश्री’वर बैठक

मुंबई | विधानसभेच्या निकालानंतर निर्माण राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. आज (१० नोव्हेंबर) एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मालाड येथील ‘रिट्रीट हॉटेल’वर जाऊन आपल्या आमदारांची भेट घेतली, चर्चा केली. तर राज्यपालांनी पाठविलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणावर सध्या ‘वर्षा’वर भाजपच्या कोअर कमिटीची आजच्या दिवसातली दुसरी बैठक सुरु असून थोड्याच वेळात भाजपची आपली याबाबत भूमिका स्पष्ट करणार आहे. थोड्याच वेळात भाजपचा सत्तास्थापनेसंदर्भातील निर्णय समोर येईल. याच पार्श्वभूमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संध्याकाळी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत भाजपच्या अंतिम निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी ‘मातोश्री’वर शिवसेनेची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी सध्या भाजपच्या कोअर कमिटीची दुसरी बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व्हिडिओ कॉन्फरेन्सिंद्वारे भाजप नेत्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचप्रमाणे, थोड्याच वेळापूर्वी केंद्राचा संदेश घेऊन भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव ‘वर्षा’ दाखल झाले आहेत. राज्यापालांच्या निमंत्रणानुसार भाजपला उद्या (११ नोव्हेंबर) सायंकाळी ८ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे. ही बैठक पार पडल्यानंतर राज्यात सत्ता स्थापन करणार की नाही ? हे भाजप जाहीर करेल. त्यानंतर ‘मातोश्री’वर शिवसेनेची बैठक होईल.

Related posts

संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होण्याची शक्यता

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षण तातडीने रद्द करा !

News Desk

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk