HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

हिंदू मतांच्या गणितासाठी भाजपच्या संकल्पपत्रात पुन्हा ‘राम मंदिरा’चा उल्लेख

नवी दिल्ली | भाजपने नवी दिल्लीतील कार्यालयात सोमवारी (८ मार्च) आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचा आपला जहरणाम प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या या संकल्पपत्रात २०१४ सालाप्रमाणेच पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आला आहे. थोड्याच महिन्यांपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यामुळे देशातील राजकारण प्रचंड तापले होते. राम मंदिरासाठी आग्रही असणाऱ्या हिंदूंच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मतांच्या गणितासाठी भाजपकडून आपल्या संकल्पपत्रात राम मंदिराच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

२०२२ सालापर्यंत आपल्या संकल्प पत्रातील ७५ संकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले आहे. भाजपने जाहीर केलेल्या या संकल्पपत्रात अनेक घोषणा तसेच अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकरी, सीमा सुरक्षा, राम मंदिर, शेती, व्यापार, कलम ३५ अ, शिक्षण, बँकिंग क्षेत्र अशा विविध मुद्द्यांचा भाजपच्या या जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे.
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेल्या घोषणा आणि यंदाच्या निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये बऱ्याच अंशी साम्य आहे.

Related posts

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले- सुप्रिया सुळे

Ramdas Pandewad

विधान परिषद निवडणूकीत बसपाचे समर्थन करणार | अखिलेश यादव

News Desk

आपला खोटेपणा समोर आल्यानंतर तथ्ये तयार करण्याचा हा काँग्रेसचा अत्यंत वाईट प्रयत्न !

News Desk