HW News Marathi
राजकारण

राज्य सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा अंहकार

प्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातून व्हिआयपी कल्चर नष्ट व्हावे, यासाठी मंत्र्यांच्या वाहनांवरील लाल दिवे हटवण्याचे आदेश दिलेले आहे. यामागचा उद्देश उदात्त असला तरी राज्य सरकारमधील काही मंत्री अद्याप व्हिआयपी कल्परमधून बाहेर पडण्यास तयार नाहीत. आजही अनेकजण सत्तेच्या अंहकाराने ग्रासलेले आहेत. मंत्रालयात याचा वारंवार प्रत्यय येतो. मंगळवारी मंत्र्याच्या मस्तीचा अनुभव याची डोळा याची देही अनुभवता आला..

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मी व माझे सहकारी सुजीत नायर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांना भेटण्यासाठी मंत्रालयात गेलो होतो. दुपारी दोनची वेळ होती. शांत रांगेत उभा राहून रितसर परवानगी घेतली होती. रांगेत उभे राहून मंत्रालयात प्रवेश मिळवला. सहाव्या मजल्यावर जाणाऱ्या लिप्टमध्ये चढलो असता दुसऱ्या मजल्यावर अचानक लिफ्ट थांबवण्यात आले व लिफ्टमध्ये सर्व ज्येष्ठांना बळजबरीने बाहेर काढण्यात आले.

चला चला बाहेर चला, साहेब आले आहेत. काही कळण्याच्या आता सर्वांना बाहेर काढण्यात आले. त्याचवेळी मंत्री मोहदय विजय बापू शिवतरे आणि त्याच्यासोबत तीन चार लिफ्टमध्ये शिरले. हा प्रकार सुरू असताना त्यांना सर्वसामान्याविषयी थोडीही किव आली नाही. सॉरी , माफ करा , अर्जेट आहे, अश्या एका शब्दानेही मंत्री मोहदयांनी दिलगिरी व्यक्त केली नाही. याचीच खंत वाटते. मात्र मंत्र्यांच्या चेहऱ्यावर सत्तेची मस्ती आणि त्यातून आलेला अंहकार दिसून येत होता. अशा मस्तवाल्या मंत्र्याकडून सामन्य लोक काय अपेक्षा ठेवणार.. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अशोक चव्हाण यांचा दावा खोटा, विधानसभा बरखास्त होणार नाही !

News Desk

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

लोकसभेतील खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna

Related posts

आरे कॉलनी परिसरात भीषण आग

News Desk

पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल, तर तो अजित पवारांनीचं! भाजपची टिका

News Desk

SharadPawar-SoniaGandhi | राज्यातील सत्तास्थापनेसंदर्भात आज दिल्लीत शरद पवार-सोनिया गांधींची भेट

Gauri Tilekar