मुंबई | लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. अकबर नायजेरियात असताना भारतात #MeToo चे वादळ घोंघावले. नाना पाटेकर व तनुश्री दत्ता प्रकरणापासून सुरू झालेले हे प्रकरण काही क्षणात देशभरात पसरले आहे. एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आहे.
प्रिया रमाणी या पत्रकार महिलेने धाडस दाखवत एशियन एजचे संपादक असताना अकबर यांनी केलेल्या छळाचा पाढा ट्विटरवर वाचला आणि अनेक महिलांनी पुढे येत अकबर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, अकबर विदेशातून परत आले आणि त्यांनी सगळे आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला आहे. तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे अकबर यांनी राजीनामा दिला आहे.
#MJAkbar resigns from his post of Minister of State External Affairs MEA. pic.twitter.com/FcNLh4cVDv
— ANI (@ANI) October 17, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.