HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

२००० रुपयांची निवडणुकांमध्ये वाटायला आणली का ?

सातारा | राज्यात एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नसतानाही  राज्यातील विरोधी पक्षांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (एप्रिल१७) साताऱ्यात तोफ डागली. नांदेड, सोलापूर, इचलकरंजीनंतर राज ठाकरे यांची साताऱ्यात जाहीर सभा आहे. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे मोदी-शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले.

मुघलांविरोधात लढण्यासाठी सर्वात आधी शिवाजी महाराजांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातून आवाज निघाला तसाच आवाज मोदी-शहांविरोधात आवाज सर्वप्रथम महाराष्ट्रातून निघणार नाही तर कुठून निघणार? माझ्यासाठी शिवाजी महाराजच प्रेरणा आहेत, असे बोलून राज ठाकरे यांनी मोदींवर हल्लाबोल केला. राज ठाकरेंनी मोदींनी केलेल्या पाच वर्षात केलेल्या कारभारचे सवाल उपस्थित करून कोटी करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

 • तरुणांचा बेरोजगार झाले, आणि निवडणुकीच्या तोंडावर
 • मोदींवर जाहीरातींवर ४५० हजार कोटी रुपये खर्च केले आहे
 • २ हजार रुपयाची नोट निवडणुकीत वाटण्यात सोपी व्हावी म्हणून तयार केली असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
 • वैमानिकांना चुकीची माहिती दिली, सकाळी साडे तीन वाजता अमित शहांनी सांगितले की, २५० जणांचा मृत्यू झाला हे सांगितले
 • पुलवामामध्ये ४० जवान शहीद झाले. मग ते आरडीएक्स कुठून आले ? याचे उत्तर पंतप्रधान मोदींनी द्यावे.
 • नरेंद्र मोदींच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात मारले गेले. त्याच्या ५ % पण यापूर्वी मारले गेले नाहीत. त्यांनी १ मारला तर आम्ही ४ मारू असे म्हणणारे हेच नरेंद्र मोदी त्यांच्या शपथविधीला नवाझ शरीफांना बोलवतात. त्यांच्या वाढदिवसाला जातात, केक भरवतात, जेवतात.
 • ज्या जवानांनी आपले कर्तव्य पार पाडले, त्यांच्यावर केसेस टाकल्या गेल्या, हे मोदींनी स्वतः मान्य केले आहे. हेच नरेंद्र मोदी नंतर मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेत बसतात.
 • साताऱ्यातील बहुसंख्य तरुण हे सैन्यात आहेत
 • जीएसटीमुळे जेट ऐअरवेज आदी उद्योग बंद पडले आहे.
 • विरोधी पक्ष असताना काँग्रेस सरकारला सांगितले होते की, जीएसटी आणू नका. परंतु स्वत: सत्ते आल्यानंतर मात्र जीएसटी लागू केली
 • भाजपची कार्यालय हे ७ स्टार हॉटले असेल्याच सारखे असून ही आलिशान कार्यलय उभी करण्यासाठी तुमच्याकडे ऐवढे पैसे आले तर कुठू यांची उत्तर द्या.
 • निवडणुकीच्या काळात भाजप ज्या पद्धतीने पैस खर्च करत आहेत ते नक्की आले कढून ते तर सांगा
 • नोटाबंदीचा निर्णय हा आरबीआयचे गव्हार्नर आणि मंत्रिमंडळा देखील नाही सांगितले. ऐवढा अविश्वास का दाखविला असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला
 • युवकांना सांगितले की, दर वर्षाला २ वर्षात रोजगार देऊन, परंतु नोटांबदीचा निर्णय देतल्यानंतर अनेक तरुण बेरोजगार झाले
 • पंतप्रधान होण्यापूर्वी काँग्रेस सरकारला प्रश्न विचार होते. आता स्वत: पाच वर्षपूर्ण केल्यानंतर देखील ते मोदी पत्रकारांच्या एकही शब्दाचे उत्तर देण्यास तयार नाही
 • गेल्या पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी जे रंग दाखवले आहेत ना ते दाखविण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे.
 • शिवरायाचा जन्म होईपर्यंत महाराष्ट्र अंधारात गेला होता.
 • पाच वर्षापूर्वी या लोकांना दिलेले आश्वान पूर्ण न केल्यामुळे ते मी जनतेसमोर मांडणार
 • मी व्हिडिओ क्लिप दाखवायाल सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मला मोदींच्या भाषणाचे क्लिप पाठवायला लागले
 • देशात पहिल्यांदा मी भाषणा देताना मी व्हिडिओ क्लिप दाखविण्याचे वेगळे तंत्र सुरू केले आहे.
 • गुढीपाढव्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू केले आहे

Related posts

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

News Desk

उमेदवार यादीत समाजाचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

News Desk

मदत कार्यावर चेष्टा करणाऱ्यांना आव्हाडांचे सडेतोड उत्तर

News Desk