HW News Marathi
राजकारण

मोदी आता राजकारणात जातीयवादाचे विष पेरत आहेत !

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात महाराष्ट्रभरात दौरे करून त्यांना मत न करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत आहेत. यापूर्वी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा आणि आज (१८ एप्रिल) पुण्यात जाहीर सभा आयोजित केली आहे. गुजरातमध्ये कथित गोरक्षकांनी घातलेला हैदोस, मागासवर्गीयांवर झालेले भीषण हल्ले आदी मुद्यावरून राज ठाकरे यांनी मोदींवर तोफ डागली.

मोदींनी माढ्याच्या सभेत मी ओबीसी असल्यामुळे माझ्यावर टीका करत आहेत. यावर राज ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधत म्हटले की, ओबीसी कार्ड खेळून पुन्हा एकदा राजकारणात जातीवादाचे विष परेत आहेत. मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या घोषणा आणि त्यानंतर त्याच मुद्यांपासून घेतलेली फारकत याचे व्हिडिओ सभेत पुन्हा एकदा सादर केले. या देशात भाजप अध्यक्ष अमित शहांच्या मुले सोडून कुणाची प्रगती झाली? अशी विचारणा राज यांनी केली.

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेत मोदींनी व्हिडिओ क्लिप दाखवून त्यांनी पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनाचा लेखा-जोका मांडतात. व्हिडिओ क्लिप दाखविण्यांची राज ठाकरेंची पद्धत सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे. खास करून राज ठाकरे यांचे #लाव_रे_तो_व्हिडीओ या हॅशटॅच्या नावाने सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. यावरून मोदी आणि राज ठाकरे यांचे मिमस देखील व्हायरल झाले आहेत.

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • नरेंद्र मोदी पुन्हा निवडून आले तर देश गुलागिरीत जाईल

  • मला कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकवायचे नाहीये पण मोदींनीच ती वेळ आणली आहे.
  • वर्षातून एकदा तुम्ही घरी आईला भेटायला जाणार आणि ते देखील मीडिया घेऊन? आज तुम्ही पंतप्रधान झालात, का नाही आईला स्वतःसोबत रहायला नेत. त्या माउलीचे आशीर्वाद मिळतील तुम्हाला.

  • मोदींच्या काळामध्ये कसे, कर्ज बुडवे देशातून फरार होतात ?
  • देशातील बँकांचा पैसा, जो तुमचा आमचा पैसा होता ते घेऊन विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, निरव मोदी, निलेश पारेख, नितीन संदेरसा, चेतन संदेरसा, रितेश जैन, सभ्या सेठ विक्रम कोठारी हे देशाबाहेर पळून गेले
  • मल्ल्या पैसे द्याला तयार होते. परंतु त्याला पळून जायाला सांगितले
  • जवानांवर केसे करून निधड्या छातीने सांगतात.
  • जे जे राष्ट्राध्यक्ष आले त्यांचे त्यांचे स्वागत मोदींनी गुजरात मध्ये का केले? त्यांना फक्त गुजरातमध्येच का नेता? देशातील इतर शहरात का नाही नेले?
  • मोदी तुम्ही एवढे जगभर फिरलात, काय साध्य केले तुमच्या परदेश दौऱ्यानी? काय मिळाले देशाला?

  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा अट्टहास का? बरे ह्यावर मोदी म्हणाले होते की मुंबई-पुणे बुलेट ट्रेन काय कामाची? बिझनेससाठी अहमदाबादलाच जावे लागते

  • नोटाबंदीमुळे लोकांचे जीव गेले, मग भाजपकडे ऐवढे पैसे आले कुठू? , असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला
  • मोदींनी आरबीआयमधून २८ कोटी काढले, कशासाठी ?

  • मोदी सरकारच्या काळात दोन गर्व्हरनने राजीनामे दिले ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना घडली आहे.
  • सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश येतात पत्रकार परिषद घेतात

  • बलात्कार हा बलात्कार असतो,अशा घटनांचे राजकारण करायचे नसते,असे मोदी सत्तेत आल्यावर म्हणाले.
  • मग सत्तेत येण्याच्या आधी निर्भयाच्या बाबतीत जी दुर्दैवी घटना घडली, अशा घटनांचे राजकरण करून तुम्ही का मतं मागत होतात? २०१२ साली बलात्काराच्या घटना २४९२२ होत्या तर २०१६ ला हा आकडा ३८८११ आहे.

  • चीन वस्तूंवर बहिष्करा ? मग पटेलांचा पुतळा कसा चीनमधून आला?

  • मोदी सरकारच्या काळात अनेक कंपन्या बंद पडल्या
  • अमित शहांच्या मुलाला सोडून देशात काय सुधारणा झाले ?
  • विरोधात असलेल्या मोदींची सत्ते आल्यानंतर भाषा बदलली
  • गोमांसची निर्यात करणारे मोदींचे जैन मित्र आहेत

  • मग मागासवर्गीयांवर झालेल्या अत्याचारावर मोदींची मौन का ?, असे सवाल राज ठाकरेंनी केली
  • मोदी आता जातीयवादाचे विष पेरण्याचे काम करत आहेत.
  • मोदी स्वत:ची जात सांगून राजकारण करत आहे, असा आरोप करत आहे.
  • पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर निवडून आल्यानंतर आताच्या निवडणुकीत या दिलेल्या आश्वासना बद्दल एक चकार शब्द देखील बोले जात नाही.

  • जगण्याचे मुल्य जगण्याचे काम राज्यकर्त्यांकडून होत नाही
  • निवडणुकीचा खेळ करून ठेवलाय
  • शहरे छान राहवीत म्हणून धोरणे आखायचे नाही.

  • आपल्याकडील शहर विकासानंतर मात्र बकाल होतात.

  • परदेशातील शहराचा विकास जर झाला तरी ती शहरे टुमदार होतात.

  • पुण्याच्या सभेत राज ठाकरे यांना रमेश वांजळे यांची आठवण
  • राज ठाकरे येत्या काळात ४ सभा उत्तर प्रदेशात करणार आहे, देशाला मराठी कळते
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमिश शहा यांच्या विरोधात महाराष्ट्रभर नाही तर देशभर प्रचार करणार आहे.
  • १७ व्या लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्प्यासाठी आज मतदान झाले आहे
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…मग पाटीदारांना आरक्षण का नाही ?

News Desk

पुन्हा एकदा शहांच्या पश्चिम बंगालमधील सभेला परवानगी देण्यास ममतांचा नकार

News Desk

आता बिहारमध्ये शिवसेनेचे एनडीएला खुले आव्हान

News Desk