HW News Marathi
राजकारण

देशात ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता !

राजगड | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या दोघांच्या विरोधात महाराष्ट्रभरात दौरे करून त्यांना मत न करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत आहेत. देशात गेल्या ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तर तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता? त्यांनी कॅशलेस गावाचा व्हिडिओ सादर करत डिजीटल गावानंतर कॅशलेस गावाची पोलखोल केली.

तसेच राज ठाकरेंनी युतीवर टीका करतान म्हटले की, सर्वांना वाटले होती की, शिवसेना-भाजप युती होणार नाही परंतु दोघेही लाचार असल्याने युती झाली. तर मोदींनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ दाखवित त्यांच्या सत्य परिस्थिती जगासमोर आली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी धसई गावाचा व्हिडीओ दाखवत देशातले धसई हे पहिले कॅशलेस गाव आहे असे मोदींनी जाहीर केले पण ह्या गावात एकच राष्ट्रीयकृत बँक आहे आणि ह्या गावात अनेकांचे बँक खाते नाही. त्यामुळे त्यांचे सगळेच व्यवहार रोखीत होतात असा आरोप केला. यापूर्वी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा पुणे आणि रायगड ही पहिल्या टप्प्यातील शेवटची जाहीर सभा आहे.

 

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अटल बिहारी वाजयपेयी यांच्या काळात कारगिलचे युद्ध झाले होते, परंतु त्यांनी कधी त्याचा बाजार केला नव्हाता
  • देशातील जवानांच्या मृत्यूचे राजकारण करत आहात, तुम्हाल राज वाटली पाहिजे
  • पहिले कॅशलेस झालेले गाव म्हणू जाहीर झालेल्या धसई गावातील सध्याची परिस्थतीवरून राज ठाकरेंची मोदींवर हल्ला बोल
  • मोदी आणि शरीफ यांचे फोटो पाहून देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना काय वाटेल
  • पुलवामा, बालाटोक हल्ल्या उल्लेख करत मोदी देशातील जनतेच्या भावनांना हात घालत आहेत
  • गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाबदद्ल मोदी बोलायला तयार नाहीत
  • हिटलरच्या मार्गाचा आवलंब करत आहेत
  • २०१४, २०१५, २०१६, २०१७ आणि २०१८मध्ये बलात्काराचे आकडे सातत्यांने वाढत जात आहेत
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा व्हिडिओ दाखवून पोलखोल केली

  • नरेंद्र मोदींनी दत्तक घेतलेल्या गावांचे
  • रिझर्व बँकेच्या नुकत्याच आलेल्या अहवालात असे सांगितले गेलेय की नोटबंदीच्या आधी जितके चलन बाहेत फिरत होते, त्याच्याहून जास्त चलन आत्ता बाहेर आले.

  • मोदी नोटबंदीच्या दरम्यान म्हणाले होते, जर नोटबंदी फसले तर मला भर चौकात शिक्षा द्या.
  • आता मोदींनी सांगायचा कुठला चौक निवडायचा.
  • सत्तेत आल्यापासून गांधी कुटुंबियांवर टीकास्त्र सोड आहेत.
  • देशात गेल्या ६० वर्षांमध्ये काही झालेच नसते, तर तुम्ही सोशल मीडियातून खोटा प्रचार कसा केला असता?
  • देशभरात मोदी पैसे वाटत फिरत आहेत, मग ऐवढे पैसे आले तरी कुठून ? राज ठाकरेंचा सवाल
  • देशातील तरुण-तरुणींची स्वप्ने चक्काचूर करण्याची काम सरकारीनी केली.
  • नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी नेमके केले तरी काय ?
  • सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने काँग्रेसच्या योजनेचे नावे बदलून सरकार चालवितात
  • वैमानिक अमोल यादव यांने मेक इन इंडियाअंतर्गत विमान बनविले, परंतु सरकारने द्याची फसवणूक केली आहे

  • नोटाबंदीमुळे देशाची वाट लागील?, मेक इन इंडियाचे काय झाले ?
  • नोटाबंदीतून जर काळापैसा बाहेर काढायचा होता तर मग भाजपकडे निवडणुकासाठी ऐवढे पैसे आले तरी कुठून

  • गेल्या ५ वर्षापासून मोदी-शहा देश चालवित आहेत, परंतु कधी जेटली यांना संधी दिली का ?

  • अनेकांना वाटले होते की युती होणार नाही, परंतु दोघेही लाचार म्हणून पुन्हा युती झाली
  • कोकणाकडे कायम दुर्लक्ष केले जेगेल, रस्त्यांचा विकास करणे म्हणजे विकास नव्हे

  • कोकणचा विकास चांगल्या पद्धतीने केल्या तर आज कायापटल होईल
  • सत्तेसाठी आणि पैशासाठी मोदी आणि शहा तुमचा विचार नाही करणार
  • नाणार प्रकल्प रद्द झाल्यावर त्यातील आंदोलक भेटले होते. स्थानिक मला भेटायला आले
  • तेंव्हा मी त्यांना सांगितले की, बेसावध राहू नका कारण हे निवडणुकांपुरत प्रकल्प रद्द केल्यासारखे दाखवतील आणि पुन्हा डोके वर काढतील

  • मोदी आणि शहा यांच्या मंडळींना माहिती नव्हेत जे काही बोलतोय ते रिकोड होत आहे हे ते विसरु जात होते.
  • गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा व्हिडिओ काढत आहोत
  • नाशिकला महापालिका निवडणुकांच्या वेळेस मी नाशिकमधल्या कामांचे सादरीकरण केले होते.

  • मोदींचे मनो रुग्ण, आम्ही केलेल्या सर्व व्हिडिओ काढून टाकत आहेत
  • पहिल्या टप्प्यातील हे शेवटचे भाषण
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केजरीवाल-ठाकरे भेटीवरुन नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल

Manasi Devkar

मुंबईतील डांबरी रस्त्यांची आवश्यकता असेल तर चौकशी करु उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

राफेल करारासाठी रिलायन्सची निवड आम्हीच केली होती !

Gauri Tilekar