मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीकरिता सोमवारी (१ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. तर मंगळवारी (२ ऑक्टोबर) मनसेकडून आपली दुसरी ४५ उमेदवारांची देखील यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, मनसेच्या या दोन्ही याद्यांमध्ये शिवसेनेचे वरळी मतदारसंघाचे उमेदवार आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. वरळी मतदारसंघात उमेदवार न उतरवून राज ठाकरे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे मदत केली जात असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याचप्रमाणे, यंदा मनसेकडून मनसे नेते बाळा नांदगावकर यांची उमेदवारी देखील कापण्यात आली आहे.
'महाराष्ट्र विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणुकीसाठीची' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी… pic.twitter.com/yPUlMGFdhb
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 2, 2019
मनसेची दुसरी उमेदवार यादी जाहीर :
- मंदार हळवे – डोंबिवली
- प्राची कुलकर्णी – धुळे
- जमील देशपांडे – जळगाव (शहर)
- मुकुंद रोटे – जळगाव (ग्रामीण)
- अकलेश पाटील – अमळनेर
- विजयानंद कुलकर्णी – जामनेर
- रविंद्र फाटे – अकोट
- विजयकुमार उल्लामाळे – रिसोड
- सुभाष राठोड – कारंजा
- अभय गेडाम – पुसद
- गंगाधर फुगारे – नांदेड (उत्तर)
- सचिन पाटील – परभणी
- विठ्ठल जवादे – गंगाखेड
- प्रकाश सोळंखी – परतूर
- संतोष जाधव – वैजापूर
- नागेश मुकादम – भिवंडी पश्चिम
- मनोज गुडवी – भिवंडी (पूर्व)
- महेश कदम – कोपरी-पाचपखाडे
- निलेश बाणखेले – ऐरोली
- किशोर राणे – अंधेरी (पश्चिम)
- सुनिल भारसकर – चांदीवली
- सतिश पवार – घाटकोपर (पूर्व)
- विजय रावराणे – अणुशक्तीनगर
- केशव मुळे – मुंबादेवी
- संजय गायकवाड – श्रीवर्धन
- देवेंद्र गायकवाड – महाड
- प्रकाश रेडकर – सावंतवाडी
- भाऊसाहेब पगारे – श्रीरामपूर
- वैभव काकडे – बीड
- शिवकुमार नगराळे – औसा
- हनुमंत भोसले – मोहाळ
- मधुकर जाधव – अक्कलकोट
- मनिषा करचे – माळशिरस
- गणेश कदम – गुहागर
- मनोज बाव्वनगडे – उमरेड
- महालिंग कंठाडे – राजूरा
- युवराज येडूरे – राधानगरी
- सुमेत भंवर – अंबरनाथ
- सुनील निभाड – डहाणू
- दिनकर वाढान – बोईसर
- संतोष नलावडे – शिवडी
- जुईली शेंडे – विलेपार्ले
- विनोद राठोड – किनवट
- डॉ. अमर देशमुख – फुलंब्री
- रामराव वानखेडे – उमरखेड
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.