HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल, मनसेकडून राज्य सरकारचा निषेध

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईतील मेट्रो भवनाचे उद्घाटन शनिवारी (७ सप्टेंबर) करण्यात आले. यावेळी भारतीय बनावटीचा कोच, मेट्रो भवन आणि मेट्रो प्रकल्पांच्या उद्धाटन समारंभ यावेळी पार पडला. परंतु, मेट्रो प्रकल्पांच्या उद्धाटनाच्या शिळेवर मराठी भाषा नसल्याच्या मुद्यावरून मनसेने पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल होत आहे, असे ट्वीट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या बाबत निषेध नोंदवला आहे. देशपांडेंनी म्हटले की, “आज उघड करण्यात आलेल्या मेट्रोच्या प्रकल्प शिळेवर #मराठी नाही, काहीही संबंध नसताना बाहेरची असलेली हिंदी मात्र आहे!

महाराष्ट्राची हिंदिपणाकडे वाटचाल. राज्य शासनाचा निषेध,” असे म्हणारे ट्वीट त्यांनी केले आहे. राज्य सरकारच्या मराठीद्वेष्टेपणाचा मनसेने समाचार घेतला आहे. यापूर्वी मनसेने दुकानांवरील पाट्यांसाठी आंदोलन केले होते.

‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रथम मेट्रो कोच का उद्घाटन समारोह श्री नरेन्द्र मोदी प्रधानमंत्री, भारत सरकार के कर कमलों द्वारा संपन्न हुआ’ असं उद्घाटन शिळेवर लिहिलेले दिसत आहे. त्याखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले यांची नावे आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सर्वाधिक कामे केली | विनायक मेटे

News Desk

टीआरएसचे नेते नारायण रेड्डी यांची दगडाने ठेचून हत्या

Gauri Tilekar

भाजपला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला तरीही भाजप दबली जाणार नाही !

News Desk