HW News Marathi
राजकारण

मनसेने भाजपला सोडवायला दिली ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका

मुंबई | महाराष्ट्रासह देशभरात येत्या दोन दिवसात चौथ्या टप्प्याचे मतदान लोकसभेकरिता होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर सभांमधून गेल्या ५ वर्षातील मोदी सरकार कार्यकाळावर सडकून टीका केली. नवी मुंबई मनसेने देखील भाजपवर ‘पेपर स्ट्राईक’ करत भाजपसाठी ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका प्रकाशित केली आहे. “५६ इंचाची छाती असलेल्यांसाठी, ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका” अशा नावाने ही प्रश्नपत्रिका नवी मुंबई मनसेने प्रकाशित केली असून, ही प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांसाठी कोणतीही शुद्ध लेखनाची अट नाही, प्रश्नपत्रिका कार्यालयात किंवा घरी बसून देखील सोडवू शकता, प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी २ दिवसांचा अवधी दिल्याचे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे.

“सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना प्रश्न विचारले तर प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरवण्याचा सपाटाच भाजपच्या नेत्यांनी लावला आहे. भाजपच्या या वृत्तीला नवी मुंबई मनसेची ही प्रश्नपत्रिका म्हणजे सणसणीत चपराकच आहे”, मत नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. शेलारांनी किमान ही ५६ मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवून दाखवावी”, असे जाहीर आव्हान गजानन काळे यांनी दिले आहे. “५६ मार्कांची प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी आणखीन एक संधी म्हणून येणार्या विधानसभा निवडणुकीत देखील “लाव रे तो व्हिडिओ चा” पार्ट-२ आणू”, असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नपत्रिका तयार केली असून त्यामध्ये प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय शोधून लिहा, योग्य पर्याय शोधून गाळलेल्या जागा भरा, वाक्यांचे संदर्भासह स्पष्टीकरण द्या, कोणत्याही तीन प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी ५० ते ६० शब्दांत लिहा, कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे ७० ते ८० शब्दांत लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, चूक की बरोबर ते सांगा, २०० ते २५० शब्दांत निबंध लिहा अशा प्रश्नांची सरबत्तीच भाजपवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परभणीत अत्यंत क्षुल्लक कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या

News Desk

RamMandir : असा असेल उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा

News Desk

उद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक

News Desk