HW News Marathi
राजकारण

प्लॅस्टिकबंदीच्या दंडात्मक कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

मुंबई | राज्य सरकारने कालपासून प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला . या निर्णयाची अंमलबजावणी होताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक बंदीने व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना पेचात पाडले आहे. प्लास्टिक वापरले की प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र प्लास्टिक पिशव्यांना ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने सर्वांच्यासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मातोश्री समोर प्लास्टिकसाठी पर्याय विचारणारे मोठ्ठे पोस्टर लावले आहे.

प्लास्टिकबंदीच्या पहिल्या दिवशीच कडक दंडात्मक कारवाई केली जात असताना प्लॅस्टिकबंदीच्या दंडात्मक कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेकडून ‘मातोश्री’बाहेर प्लॅस्टिकबंदीच्या दंडाला विरोध करणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. राज्यातील प्लास्टिक बंदीचा मनसेने मातोश्रीबाहेर पोस्टरबाजी करत दंड वसूलीचा उपरोधिक विरोध करण्यात आला आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याकडून पाच हजार ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. दंड वसूलीऐवजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना वॉटरप्रूफ कापडी पिशवी द्यावी, असे आवाहन या पोस्टरमध्ये करण्यात आले आहे. या पोस्टरच्या माध्यमातून मनसेने पर्यावरण मंत्री, महापौर, पालिका आयुक्त आणि नगरसेवकांना प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करुन देण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ :-

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन; असा आहे मुंबई दौरा

Aprna

दोन नेते, दोन मेळावे, कोण गाजवणार मैदान?

Manasi Devkar

राज्य छत्रपती, आंबेडकरांचे, गहाण कोण ठेवतंय | ठाकरे

swarit