मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नागपुरातमध्ये भेट घेतली आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांमध्ये 15-20 मिनिटे नागपूरच्या राज ठाकरे हे आज (23 डिसेंबर) एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहे. आणि राज ठाकरेंनी नागपूरच्या विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले होते. या दोघांमध्ये नेमके कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मनसेच्या नागपूर शहराची पुन्हा एकदा कार्यकारणी स्थापन होते. यात 500 जणांना नियुक्ती पद देण्यासाठी राज ठाकरे नागपूरच्या एक दिवसी दौऱ्यावर आले होते. राज ठाकरेंनी नियुक्ती पदाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरात सुरू आहे. यापूर्वी राज ठाकरे गणेशोत्सवा निमित्ताने मुख्यंत्री राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर मनसे दिवाळी निमित्ताने दादरच्या शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेल्या मनसेचा दिपोत्सव कार्यक्रमात मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यामुळे नव्या युतीचे संकेत दिल्याच्या चर्चा तेव्हा देखील रंगल्या होत्या.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.